धोनी चेन्नईत शेवटचा सामना खेळणार!CSK सीईओ विश्वनाथयांचा खुलासा


dhoni
चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) सीईओ कासी विश्वनाथ यांनी अलीकडेच महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल भविष्याबाबत मत व्यक्त केले. धोनी आयपीएलच्या 18 व्या मोसमात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला CSK ने अनकॅप्ड खेळाडू म्हणून 4 कोटी रुपये देऊन कायम ठेवले.

धोनी पुढे खेळणार की आयपीएल 2025 हा त्याचा शेवटचा मोसम असेल याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. CSK सीईओ विश्वनाथ यांनी खुलासा केला की कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेला धोनी सर्व काही स्वतःकडे ठेवतो. धोनीने शेवटचा सामना चेन्नईत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, असेही ते म्हणाले.  जोपर्यंत धोनीला खेळायचे आहे तोपर्यंत त्याच्यासाठी सीएसकेचे दरवाजे सदैव खुले असतील. असे ही ते म्हणाले. 

 

फॅन फॉलोइंगच्या प्रकारामुळे धोनीने अनेक मुलाखतींमध्ये असेही सांगितले आहे की त्याला चेन्नईमध्ये शेवटचा सामना खेळायचा आहे. त्याने जास्तीत जास्त खेळावे अशी आमची इच्छा आहे

 

सीएसकेने धोनीशिवाय, कर्णधार रुतुराज गायकवाड (18 कोटी), मथिशा पाथीराना (13 कोटी), शिवम दुबे (12 कोटी) आणि रवींद्र जडेजा (18 कोटी) यांना कायम ठेवले होते. पाच रिटेंशनमुळे, सीएसकेने 120 कोटी रुपयांच्या पर्समधून 65 कोटी रुपये खर्च केले होते. मेगा लिलावासाठी CSK कडे 55 कोटी रुपयांची पर्स उपलब्ध आहे.

 Edited By – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top