सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे दीपक साळुंखे पाटील यांसारखे सैनिक मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडतात -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

सांगोला/ज्ञानप्रवाह न्यूज – सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे दीपक साळुंखे पाटील यांसारखे सैनिक मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडतात .2019 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीच मी शिवसेना पक्षाकडून दीपक साळुंखे पाटील यांना उमेदवारी देणार होतो परंतु काही कारणास्तव त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही. 2019 ला शिवसेनेचा आमदार निवडून आणणार असा त्यांनी मला शब्द दिला होता त्यामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेने फक्त दीपक साळुंखे पाटील यांनाच आमदार करावे .सांगोला तालुक्यातील जनतेच्या मनात असणारे एकही प्रश्न ते शिल्लक ठेवणार नाहीत असे अभिवचन शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगोला येथे दिले. 253 सांगोला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला येथे आयोजित केलेल्या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे बोलत होते.

सांगोला विधानसभा मतदारसंघातील धनगर समाज बांधवांनी काठी आणि घोंगडं व ढोल देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्र कधीही गद्दाराला क्षमा करत नाही इथल्या गद्दाराने गुवाहाटीचा डोंगर पाहिला पण इतका रायगड टकमक टोक पाहिलं नाही सांगोला तालुक्यातील सुजाण जनता या गद्दारांना 23 तारखेला रायगडचे टकमक टोक दाखवेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दारांच्या छाताडावर भगवा रोवायला मी सांगोल्यात आलो आहे. येत्या 23 तारखेला सांगोल्याची जनता गद्दारांचा कडेलोट करेल आणि 24 तास जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारा दीपक साळुंखे पाटील यांच्यासारखा सैनिक महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवेल असा विश्वास व्यक्त केला.खेडशिवापूर येथील टोलनाक्यावर एकाची पैशाची गाडी सापडली होती त्यात 25 कोटी होते पण पाच कोटी दाखवले.सांगोला तालुक्यातील जनता ही स्वाभिमानी आहे ती कदापि विकली जाणार नाही स्वाभिमानी सांगोलकर हे 20 तारखेला मशालीचे बटन दाबून दीपकआबांना प्रचंड मताने नक्कीच विजय करतील आणि शहाजीबापू पाटील यांना कायमस्वरूपी घरी बसतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक साळुंखे पाटील म्हणाले तीस वर्षाच्या काळात जातपात बाजूला ठेवून 18-18 तास काम केले.आघाडीच्या राजकारणात शेकापच्या गणपतराव देशमुख यांना प्रामाणिकपणे साथ दिली.यावेळेला मला साथ द्या अशी देशमुख बंधूंना आणि शहाजीबापूंना विनंती केली होती मात्र त्यांनी पाठिंबा देण्यास नकार दिला. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार असून शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सांगोला तालुका टेल ला असल्याने टेंभू म्हैसाळ नीरा उजवा कालव्याचे हक्काचे पाणी देण्याचा कायदा करावा ,डाळिंब प्रक्रिया उद्योग सांगोल्यात आणावा, दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी चाळीस रुपयांचा हमीभाव मिळावा, गलाई उद्योगाला सूक्ष्म लघु उद्योगाचा दर्जा द्यावा ,धनगर समाजाला माडग्याळ मेंढी प्रजनन केंद्र स्थापन करावे ,महिलांच्या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्वर्गीय मीनाताई ठाकरे उद्योग भवनाची निर्मिती करावी, प्रत्येक महामंडळाला 500 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी केली होती.

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक साळुंखे पाटील यांच्या भाषणाचा धागा पकडत शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगोला तालुक्यातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असे अभिवचन सांगोला मतदार संघातील जनतेला दिले.
यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळी, जेष्ठ शिवसेना नेते साईनाथ अभंगराव,शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीसी झपके,तुषार इंगळे,चंद्रकांत करांडे , चंद्रकांत चौगुले,शिवाजी बनकर, नवनाथ मोरे,अजित देवकते, रणजीत बागल, मंगेश मस्के ,रवींद्र कांबळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडताना आमदार शहाजी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

आमदार मिलिंद नार्वेकर,जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड,गणेश वानकर ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीसी झपके,रणजीत बागल, तानाजी पाटील, शिवसेना ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव ,शिवसेना उपनेते शरद कोळी,शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे ,शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद पाटील, शहरप्रमुख तुषार इंगळे ,अनिल खटकाळे, योगेश खटकाळे ,शिवाजी बनकर, सूर्यकांत घाडगे, नवनाथ मोरे, विनोद रणदिवे, सूर्याजी खटकाळे ,भारत गवळी, मधुकर बनसोडे, नितीन रणदिवे, अनिल खडतरे, विजय येलपले, जयमाला गायकवाड,दिलीप मोटे, अनिल मोटे, डॉ.धनंजय पवार, शाहू राजे मिटकरी, यशराजे साळुंखे पाटील, राजेंद्र देशमुख, बिरा पुकळे ,शिवाजी जावीर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
