भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकजअडवाणीने 28 व्यांदा बिलियर्ड्सचे विजेतेपद पटकावले


pankaj advani
भारताचा अनुभवी आणि स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणीने आणखी एक विशेष कामगिरी आपल्या नावावर नोंदवली आहे. दोहा येथे इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा 4-2 असा पराभव करून त्याने 28व्यांदा IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली.

 

पंकज अडवाणीने 151-94, 151-0, 150-84, 74-151, 6-154, 152-46 असा विजय मिळवला. सलग सातव्यांदा हे विजेतेपद पटकावण्यात पंकजला यश आले आहे. विजयानंतर पंकज अडवाणी म्हणाले की, जागतिक बिलियर्ड्सचे विजेतेपद पुन्हा पुन्हा जिंकून चांगले वाटते. मात्र, ही स्पर्धा सोपी नव्हती. स्पर्धा बरीच चुरशीची होती.

 

अडवाणीने 2016 मध्ये पहिले जगज्जेतेपद पटकावले होते. कोरोना महामारीच्या काळात 2020 आणि 2021 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले नव्हते.

Edited By – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top