महायुती सरकारने स्त्रियांच्या सक्षमीकरणावर भर दिल्याने राज्यात स्त्रियांच्या मतपेढीत वाढ – शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे
महायुती सरकारने स्त्रियांच्या आर्थिक विकासाचे दार उघडण्याचे कार्य केले
पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९ नोव्हेंबर २०२४ : आज पुणे येथे शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बोलताना सांगितले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने स्त्रियांच्या सशक्तीकरणावर भर दिला आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महिलांना राजकारणात संधी मिळावी यासाठी केंद्रात महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतले आहे.यामुळे राज्यात पहिल्यांदाच महिलांची मतपेढी वाढल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्याची गंभीर दखल घेत त्यादृष्टीने प्रचाराची आखणी केल्याचे दिसत आहे.

त्यापुढे बोलताना म्हणाल्या की,विरोधकांकडून लाडक्या बहिण योजनेचा फक्त आर्थिक मोबदला महिलांना मिळतोय एवढाच अपप्रचार केला जात आहे.मात्र महायुती सरकार कडून लाडक्या बहिणीला समाजातील नागरिक म्हणून खरा हक्क मिळवून देण्यात आला आहे.स्त्रियांच्या आर्थिक विकासाचे दार उघडण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने केले आहे. त्यामुळे स्त्रियांच्यातील आत्मविश्वास वाढीस लागला आहे.स्त्रिया आता जागरूक झाल्याने त्या शासनाच्या योजना घरोघरी राबवून योजना दूत बनल्या असल्याचे डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगितले.

याप्रसंगी युवासेना सचिव किरण साळी, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत उपस्थित होते.
