अनिल सावंत यांना पंढरपूर तालुक्यातील जेष्ठ नेते वसंत देशमुख यांचा पाठिंबा

अनिल सावंत यांना पंढरपूर तालुक्यातील जेष्ठ नेते वसंत देशमुख यांचा पाठिंबा

माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंढरपूर तालुक्यातील जेष्ठ नेते वसंत देशमुख यांचा पाठिंबा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची यशस्वी शिष्टाई

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यशस्वी शिष्टाई करत माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंढरपूर तालुक्यातील जेष्ठ नेते वसंत देशमुख यांचा पाठिंबा मिळवून दिला आहे.याशिवाय मंगळवेढा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीनेही अनिल सावंत यांना पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना हा धक्का मानला जात आहे.

वसंत देशमुख हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते.यासाठी वसंत देशमुख यांनी खासदार शरद पवार यांची अनेकदा भेट घेऊन विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती.वसंत देशमुख यांना कासेगाव जिल्हा परिषद गटासह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात मानणारा एक मोठा गट अस्तित्वात आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होऊन राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटातर्फे अनिल सावंत आणि काँग्रेस पक्षाच्यावतीने भगीरथ भालके हे निवडणूक लढवीत आहेत.अनिल सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने एबी फॉर्म देण्यात आला असून कॉंग्रेस पक्षाच्या वतीने एबी फॉर्म भगिरथ भालके यांना देण्यात आला आहे.भगिरथ भालके यांना प्रथम एबी फॉर्म देण्यात आला होता.असे असताना काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिका-यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा दिल्याने मतदार संघात वेगळीच चर्चा होत आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल शहा, पांडुरंग जावळे, अशोक पवार, शिवाजी पवार, राजाराम जगताप, विजय देशमुख, दिलीप जाधव, शिवशंकर भांजे, वाबुराव पाटील चंद्रकांत पाटील संतोष गोवे मुबारक शेख, विकास मिटकरी लक्ष्मण गायकवाड,विक्रम साखरे,नामदेव डांगे, पांडुरंग मेहकर, अशोक लेंडवे, दिलीप कौसाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top