महाविकास आघाडीच्या विचारधारेवर आधारित आगामी योजनांची माहिती व लोकसेवेची पंचसूत्री मतदारांसमोर
या मतदारसंघात विकासाच्या नव्या योजना राबवण्याचा संकल्प ज्याचा थेट लाभ मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना होईल- अनिल सावंत
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज :- 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी जोरदार प्रचार चालू केला आहे.
या दौऱ्यात महाविकास आघाडीच्या विचारधारेवर आधारित आगामी योजनांची माहिती व लोकसेवेची पंचसूत्री मतदारां समोर मांडली आणि गावकऱ्यांना विकासाचे नवे दृष्टिकोन समजावून सांगितले. महाविकास आघाडीच्या सहकार्याने या मतदारसंघात विकासाच्या नव्या योजना राबवण्याचा संकल्प आहे.ज्याचा थेट लाभ मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना होईल असे सांगितले.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आजच्या गावभेट दौऱ्याचा यशस्वी समारोप झाला. या दौऱ्यादरम्यान मतदारसंघातील विविध गावांना भेट देऊन स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या व अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला.
मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी,डोणज , नंदुर,अरळी,लमाण तांडा बालाजीनगर, कागष्ट, मरवडे, जित्ती ,येड्राव, माळेवाडी , हुलजंती,पौट ,बावची ,जंगलगी,चिक्कलगी, निंबोनी, जालिहाळ, भाळवणी, हिवरगाव, तळसंगी, खोमनळ आदी २१ गावांमध्ये प्रचार करताना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
गावभेट दौऱ्यात गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी स्थानिक पायाभूत सुविधा, रोजगार संधी, शेतकरी प्रश्न, जलसंधारण, शिक्षण आणि आरोग्य सुविधा अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. प्रत्येक गावात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले प्रश्न मांडत होते. यावेळी त्यांच्या समस्या निवारणासाठी ठोस उपाययोजना करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी महिला वर्गाने त्यांचे औक्षण करून त्यांना मतदानरुपी आशीर्वाद देऊन आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले . या मतदार संघात आम्ही सर्व शरद पवार साहेबांची माणसे असून त्यांचा निर्णय योग्यच असतो आणि त्यांनी दिलेल्या उमेदवाराला आम्ही निश्चितच भरघोस मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असेही सांगितले.