लाडकी बहीण योजनेत पैसे देऊन इतर महागाईच्या माध्यमातून जनतेकडून पैसे काढून घेण्याचे काम सध्या सुरू – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

लाडकी बहीण योजना देताना मग लाडका भाऊ का आठवला नाही ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना निवडून द्या मग पहा कसा कायापालट या मंगळवेढा तालुक्याचा होतोय ते

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/११/२०२४ –लाडकी बहीण योजनेत पैसे देऊन इतर महागाईच्या माध्यमातून जनतेकडून पैसे काढून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. लाडकी बहीण योजना देताना मग लाडका भाऊ का आठवला नाही ? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवेढा येथे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले की,महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अनेक विधानसभा निवडणुका होऊनदेखील अद्यापही मंगळवेढा तालुका दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो ही लाजिरवाणी गोष्ट आहे.आजपर्यंत ज्यांना निवडून दिले आहे, त्यांनी फसवले आहे. रोजगार निर्मिती नसल्याने ग्रामीण भागातील तरुणांचे लोंढे शहराकडे जात आहेत. दुष्काळाचा कलंक पुसायचा असेल तर येथील जनतेने माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना निवडून द्या मग पहा कसा कायापालट या मंगळवेढा तालुक्याचा होतोय ते.

लोकप्रतिनिधींची घरे पुणे,मुंबईला असून ते केवळ निवडणुकांपुरते लोकांत मिसळतात. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, महिला, तरुणी सुरक्षित नाहीत.गेल्या साठ वर्षांपासून ठराविक मुद्द्यांवरच निवडणुका लढवून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली जाते आहे. त्यांना त्याचा जाब विचारणे गरजेचे होते, परंतु तुम्ही त्यांना जाब विचारला नसल्याने तुमची अशी अवस्था झाली आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.माझ्या हातात सत्ता देऊन बघा कसा विकास करतो ते असेही नवनिर्माण सेने चे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातील जनतेला विकास हवा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना विजयी करा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top