धर्मकारण,राजकारण व समाजकारण याचा उत्तम समन्वय करण्याचे काम स्व.धर्माजी भोसले यांनी केले:-ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख

धर्मकारण,राजकारण व समाजकारण याचा उत्तम समन्वय करण्याचे काम स्व.धर्माजी भोसले यांनी केले :-ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख

स्व.धर्माजी भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त कीर्तनकार ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ ऑक्टोंबर २०२४- स्व.धर्माजी भोसले पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय अध्यक्ष विश्व वारकरी संघ, संत तुकाराम महाराज मंदिर व पालखी सोहळा सदस्य देहू महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम बाल हनुमान मंदिर नरसिंग गिरजी चाळ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कीर्तनाचे आयोजन बाल हनुमान भजनी मंडळ हभप महादेव बुवा शिंदे महाराज, गणराज तरुण मंडळ व धर्मा भोसले सोशल फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते.

ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख उपदेशात म्हणाले की, चंद्र त्याच्या चांदण्या पसरून विसरून जातो, सूर्य त्याचा प्रकाश उधळून विसरून जातो, झाडं पण कधी स्वतःच्या सावलीबद्दल उपकार दर्शवत नाहीत, नदी सुद्धा स्वतः पाण्याचा भार वाहून इतरांची तहान भागवते पण कधी स्वतःचा हक्क सांगायला येत नाही, फुलसुध्दा स्वतःचा सुगंध फक्त स्वतःसाठी लपवून ठेवत नाही, जे प्राप्त झालं निसर्गापासून ते निसर्गाला अर्पण करतो.वेगवेगळे ऋतू येतात, स्वतःची बहार उधळतात आणि निघून जातात, ढग ही स्वतः पाण्याने भरला की स्वतः रिकामा होऊन इतरांची तहान भागवतो आणि परत पाणी भरायला निघून जातो, निसर्ग एवढा परोपकारी आहे तर माणूसच का असा, प्रत्येक प्रसंगी,प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क सांगतो, इतरांना देणं सोडा, फक्त घेण्याचाच विचार बाळगतो, जे मिळालं आहे, ते एक ना एक दिवस इकडंच सोडून जायचं आहे, मग कशाला आणि कोणावर हक्क दाखवतो,जो आलाय तो जाणार,मग कशाला भार उचलायचा,निस्वार्थी व्हायला शिका, ही चार दिवसांची जत्रा आहे, मग सगळं सोडून निघावं लागेल, माणूस स्वतःसाठी किती कमावतो त्यापेक्षा तो इतरांच्या आयुष्यात काय बदल घडवून आणतो त्यामुळे मोठा होतो.धर्माजी भोसले यांनी आयुष्यभर गोरगरीब,दीन दुबळ्यांची सेवा केली, संपत्ती पेक्षा चांगली संतती, लाखमोलाची माणसे कमावली.

पुत्र विनोद आणि अमोल यांना चांगले संस्कार दिले.कायम टिकणारी एकच गोष्ट आणि ती म्हणजे माणुसकी म्हणूनच स्व.धर्माजी भोसले यांनी पैशापेक्षा जीवाभावाची माणसे जोडली. त्यामुळेच त्यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाला एवढी माणसे जमली हीच त्यांची खरी संपत्ती. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर तुमच्याकडे असलेल्या नोटा मोजू नका कधी डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा.आपण चालतो तेव्हा किती आपल्याबरोबर येतात ते मोजा, आपण बसतो तेव्हा किती आपल्याबरोबर बसतात ते मोजा, माणूस स्वतःसाठी किती कमावतो त्यापेक्षा तो इतरांच्या आयुष्यात काय बदल घडवून आणतो त्यामुळे मोठा होतो.यशाच्या शिखरावर असतानाही कायम पाय जमिनीवर ठेवून वावरणारे वारकरी सांप्रदायाचे परोपकारी वृत्तीचे, दानशूर उदार व्यक्तीमत्त्व म्हणजे स्व.धर्माजी भोसले….जे सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांसाठी येणाऱ्या नवीन पिढीसाठी कायमच मार्गदर्शक राहतील.तुम्ही जिथे कुठे असाल तिथे ईश्वर तुम्हाला सुख शांती देवो हीच प्रार्थना तुमचा सहवास, तुमचे शब्द सर्वांना आजीवन प्रेरणा देत राहतील.

यावेळी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष चेतन नरोटे, अमोल शिंदे ,माऊली पवार ,बाबा करगुळे, गणेश डोंगरे, अनंत जाधव, अंबादास गुत्तीकोंडा ,राज सलगर ,अरीफ पठाण, तिरुपती परकीपडंला,अँड मयूर खरात, सुहास कदम, संजय पाटील, प्रशांत बाबर , नागेश खरात, अनिल पल्ली, रोहित खताळ समीर शेख,सुभाष वाघमारे,राजासाब शेख,संजय गायकवाड, विवेक कन्ना,राजेंद्र शिरकुल ,पांडुरंग भोसले ,रमेश भोसले, मुन्ना तळीकेडे ,विनोद क्षीरसागर ,सुभाष गडदे, माणिक अक्कलवाडे ,शाहू सलगर ,बसू अण्णा कोळी ,श्रीकांत गायकवाड ,अमित राठोड ,नितेश पवार, मदन सलगर ,नितीन जमदाडे ,सचिन टिक्ते ,चंद्रकांत पात्रे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top