अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी मोर्चा व उपोषणाचा फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांचा इशारा
फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज – अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दि.22 ऑक्टोबर रोजी मोर्चा व उपोषण करणार असल्याचा फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी इशारा दिला आहे.
दि.14 ऑक्टोबर रोजी अहिंसा मैदान फलटण येथे संपन्न झालेल्या बैठकीमध्ये उपोषण व मोर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.या मोर्चामध्ये वयस्कर महिला,आजारी असणारे पीडित सहभागी होणारा असून ते ॲम्बुलन्समध्ये सहभागी असणार आहेत. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी केले आहे.