आपण सर्व मिळून देश सायबर क्राईम मुक्त करु या – ॲड.चैतन्य भंडारी यांचे आवाहन

आपण सर्व मिळून देश सायबर क्राईम मुक्त करु या – ॲड.चैतन्य भंडारी यांचे आवाहन

धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज: देशभरात ऑक्टोबर महिना हा सायबर अवेरनेस म्हणून साजरा केला जातो. या संदर्भात १ ऑक्टोबर रोजी सायबर अवेरनेस फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. चैतन्य भंडारी यांनी धुळ्यात एक वेगळा उपक्रम येथील सुप्रसिध्द द जिम येथे राबवलेला आहे.

या उपक्रमात शारिरीक फिटनेससह सायबर सुरक्षेसंदर्भात सावधानता कशी बाळगली पाहिजे याबाबत सर्वसामान्य जनतेला ॲड. भंडारी यांनी मार्गदर्शन केले.जिममध्ये येणा-या नागरिकांना सायबर गुन्हेगाराविषयी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून जनतेची सायबर गुन्हेगार कशी फसवणुक करतात यासंदर्भात सावध केले.

यावेळी त्यांनी असेदेखील सांगितले की, आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो तसेच आपण या तंत्रज्ञानाचा वापर करताना देखील आपला कसा बचाव करता येईल याबाबत ॲड.भंडारी यांनी मार्गदर्शन केले. देशभरात ऑक्टोबर हा महिना सायबर जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आपणदेखील हा संपुर्ण महिना कशा प्रकारे साजरा केला पाहिजे जेणेकरुन सामान्य नागरिक सायबर सुरक्षित राहील याबाबत सांगितले.त्यांनी आधारकार्ड सुरक्षेविषयी देखील माहिती दिली.सोशल मिडीयाचा वापर करतांना आपण कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत याबाबत देखील त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी द जिमचे संचालक शशिकांत अग्रवाल, अभिषेक अग्रवाल व जिममध्ये येणारे ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top