शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून चांदवडच्या रेणुका माता मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी ११ लाखाचा निधी जाहीर
चांदवड येथे शिवसेना महिला आघाडीचा मेळावा उत्साहात संपन्न
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले चांदवडच्या रेणुका मातेचे दर्शन
नाशिक ,दि.११ ऑक्टोबर २०२४ : नवरात्र उत्सवानिमित्ताने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चांदवड येथील श्री रेणुका माता देवीचे दर्शन घेऊन देवीची विधिवत पूजा करत देवीला महावस्त्र, नैवेद्य, पुष्पहार अर्पण केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना आघाडीच्या महिला मेळाव्यामध्ये रेणुका देवी माता देवस्थान परिसराच्या सुशोभीकरणासाठी अकरा लाख रुपयेचा निधी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी जाहीर केला.

शिवसेना महिला आघाडीच्या मेळाव्यात बोलताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, पक्षश्रेष्ठ तिकीट देताना जो निर्णय घेतील त्याच्या पाठीमागे उभे राहून भरघोस मतांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करावे. जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी यांचे काम अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध असल्याचे सांगत त्यांनी चौधरी यांच्या कामाचे कौतुक केले. भाऊसाहेब चौधरी यांना उमेदवारी मिळाल्यास येथील जनता त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहील असा विश्वास डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवस-रात्र जनतेचा सेवा करत आहेत. यामध्ये त्यांनी समाजातील सर्व क्षेत्रांचा विचार करून त्याकरता विविध महामंडळांची स्थापना केलेली आहे. नुकततेच पत्रकारांसाठी देखील महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. यातून पत्रकारांना वैद्यकीय उपचारासह विविध लाभ मिळणार असल्याचे डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी सांगितले.
यावेळी भाऊ चौधरी सचिव शिवसेना, श्यामल दीक्षित जिल्हा समन्वयक, रोशनी कुंभार्डे चांदवड जिल्हा प्रमुख, मंगलाताई भास्कर जिल्हा प्रमुख दिंडोरी, अस्मिता देशमाने महानगर प्रमुख, श्रद्धा जोशी ग्रामीण जिल्हा प्रमुख, पूजा धुमाळ इगतपुरी जिल्हा प्रमुख यांसह मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.
