अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदोत्सवानिमित्त पहिले पुष्प गुंफण्यात आले

अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदोत्सवानिमित्त पहिले पुष्प गुंफण्यात आले

कार्यक्रमांमध्ये पहिल्या व दुसऱ्या वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि ०७/१०/२०२४- येथील अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदोत्सवानिमित्त पहिले पुष्प गुंफण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जोतिराम फडतरे सर ग्रामीण कथाकार आणि अध्यक्षस्थानी सु .रा.पटवर्धन सर मानद सचिव पंढरपूर एज्युकेशन सोसायटी हे होते.

या कार्यक्रमांमध्ये पहिल्या व दुसऱ्या वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी काही प्रोजेक्ट बनवले होते त्यामध्ये विशेष करून डीफोरेस्टेशन तसेच सूर्यमाला या प्रोजेक्टचे उद्घाटन झाले. त्याचबरोबर संस्कार मोती या भित्तीपत्रकाचेही उद्घाटन करण्यात आले .

जोतिराम फडतरे सरांनी मनोगतामध्ये ग्रामीण कथा सांगून मुलांना मनोरंजनात्मक मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणामध्ये सुधीर पटवर्धन सरांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजनंदिनी गायकवाड व बहिरवाड मॅडम यांनी केले.

विद्यार्थी मनोगतामध्ये ओम कोरे ,ऋतुजा महाडिक, सुजाता दोडमिसे, मयुरी मुद्गुल यांनी विचार व्यक्त केले. प्राचार्य हणमंत वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करत मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन श्रीपाद हरिहर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top