ओंकार कला अकादमी चेन्नईच्या बालकलाकारांनी सुमधुर स्वरांनी जिंकली पंढरपूरकरांची मने
अतुल खांडेकर यांचे रसाळ सुमधुर स्वरांनी रसिक तृप्त
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, आणि सर्व सन्माननीय मंदिर समिती सदस्य आणि व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या प्रयत्नातून प्रतिवर्षाप्रमाणे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाच तिसरे स्वरपुष्प ओंकार कला अकादमी चेन्नई चे विद्यार्थी आणि अतुल खांडेकर यांनी गुंफले.

सुरुवातीला मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री , श्री व सौ अर्चना श्रीधर मनी, अवंतिका पाटील यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
पहिल्या सत्रात सुरुवातीला चेन्नई येथील ओंकार कला अकादमीच्या लहान विद्यार्थिनींनी सुंदर अभंग गायन करत पंढरपूरकर रसिकांची मने तर जिंकलीच आणि तितकाच रसिकांनीही उदंड प्रतिसाद दिला. त्यांना तबला साथ सबरीश पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनियम रंगराजन यांनी केली.

दुसऱ्या सत्रात ख्यातनाम गायक अतुल खांडेकर यांच्या गायनाला सुरुवात झाली. पांडूरंग अष्टक पुष्पांजलीने कार्यक्रमाची सांगता केली.त्यांना हार्मोनियम लीलाधर चक्रदेव, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, तबला माऊली खरात, टिळक सुदर्शन कुंभार, स्वरसाज पार्थ कुलकर्णी यांनी केली.
या कार्यक्रमासाठी सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सरांनी केले. पुढेही ५ दिवस चालणाऱ्या या संगीत महोत्सवात ख्यातनाम गायक गायिका यांची उपस्थिती असणार असून दररोज सर्व रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत.