जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिका सोलापूर,सोलापूर ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ सोलापूरच्यावतीने ज्येष्ठांचा सन्मान
सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर महानगरपालिका सोलापूर, सोलापूर ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ सोलापूरच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या जेष्ठ मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा गौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

शहर उत्तर सोलापूरचे आमदार व माजी सोलापूर जिल्हा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते आणि सह आयुक्त ज्योती भगत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृती चिन्ह, शाल मोतीमाला व पुष्पगुच्छ असे होते. ज्येष्ठ नागरीक अर्थक्रांतीचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय देशमुख दबडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जीवनगौरव अभियान पुरस्कार संपन्न झाला.
उपायुक्त तैमुर मुलाणी सोलापूर महानगरपालिका सोलापूर, घनश्याम दायमा अध्यक्ष सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ,गुरुलिंग कन्नूरकर अध्यक्ष सोलापूर ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती आयोजित कार्यक्रम लोकमान्य टिळक सभागृह, हिराचंद नेमचदं वाचनालय शुक्रवार दि ४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी संपन्न झाला.
याप्रसंगी हिराचंद नेमचंद सभागृहाच्या व्यासपीठावर माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महानगरपालिकेच्या सहा आयुक्त ज्योती भगत पाटील, उद्योजक रंगनाथ बंग, आपासाहेब कानाळे,जेष्ठ पत्रकार अरुण बारस्कर, राष्ट्रीय अध्यक्ष विजय दबडगावकर, गुरुलिंग कुंनूरकर, घनश्याम दायमा, कवी देवेंद्र आवटी, शर्मा मॅडम आदी विराजमान होते. या कार्यक्रमासाठी संजय शहा, अशोक छाजेड, योगीन गुज्जर, मनोज क्षीरसागर, अजित शहा, अरुण धुमाळ, आडकी, लोखंडे सर आदींसह ज्येष्ठ पुरुष व महिला उपस्थित होते.

यावेळी सोलापूर रत्न पुरस्कार
१) श्री.केतनभाई शहा २) पंडित आनंद बदामीकर
जीवनगौरव पुरस्कार
१) श्री रंगनाथ बंग २) श्री.आप्पासाहेब कनाळे
लोक रत्न पुरस्कार
श्री.अरुण बारसकर
समाज रत्न पुरस्कार
१ श्री. विजय सहस्त्रबुध्दे माजी अध्यक्ष विवेक ज्ये.ना. संघ
२) प्रा.विलास मोरे अध्यक्ष साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघ
३) श्री.अशोक ठोंगे पाटील अध्यक्ष, कर्णिकनगर एकतानगर
४) श्री.मन्मथ कोनापुरे सचिव, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ
५) श्री.सिद्राम संके अध्यक्ष बथनाळ ज्येष्ठ नागरिक संघ
६) श्री.अरूण कदम द्वारकाधिकश ज्येष्ठ नागरिक संघ
७) श्री.चन्नय्या स्वामी जागृती ज्येष्ठ नागरिक सामाजिक संघटना
८) श्री.जयकुमार काटवे,जागृती ज्येष्ठ नागरिक संघ
९) श्री.विजयकुमार भोसले,आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ
१०) श्री.बाबूराव नरुणे,अध्यक्ष विक्रीकर से.नि.ज्ये.ना. संघ
११) श्री.नागेश कुंभार, अध्यक्ष प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ
१२) श्री.शंकर बटगेरी,अध्यक्ष विरंगुळा ज्ये. ना. संघ
१३) श्री.एम.बी.काळे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक मंडळ मार्डी
१४) श्री.सिद्रामप्पा हुंडेकर माजी अध्यक्ष नंदनवन ज्ये.ना.स.
१५) श्री.नागनाथ कदम अध्यक्ष,श्री समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ.
१६) श्रीमती जयश्री जहागीरदार अध्यक्ष उत्र्कष महिला ज्ये.ना.
१७) डॉ. सरीता कोठाडिया अध्यक्षा जैन सिनिअर सिटीझन
१८) श्री.जगन्नाथ पाटील अध्यक्ष सांगली ज्येष्ठ अर्थक्रांती
१९) श्री.नागनाथ अधटराव अध्यक्ष पंढरपूर ज्येष्ठ अर्थक्रांती
