पंढरपूर एज्युकेशन सेवक सहकारी पतसंस्थेने सात टक्के लाभांश जाहीर
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर एज्युकेशन सेवक सहकारी पतसंस्थेने सात टक्के लाभांश जाहीर केला आहे. कवठेकर प्रशाला, द. ह. कवठेकर प्रशाला ,अध्यापक विद्यालय पंढरपूर ची पंढरपूर एज्युकेशन सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

यावेळेस इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या मुला मुलींना फेटा बांधून व 1000 रुपये चे पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर पतसंस्थेचे माजी संचालक द.ह.कवठेकर प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षक गजेंद्र शंकर पवार सर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. गेल्या महिन्यात बिनविरोध निवडून आलेल्या सर्व नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.

या सभेचे अहवाल वाचन सुधीर मागाडे सर यांनी केले.सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन राजेश धोकटे सर होते. या सभेस बहुसंख्य सभासद उपस्थित होते.उपस्थित सभासदां पैकी श्री बडवे सर,नरेंद्र भंडारकवठेकर सर आदी सभासद बंधू-भगिनींनी संस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले आणि सर्व संचालक मंडळाचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या सभेस चेअरमन राजेश धोकटे सर,व्हाईस चेअरमन प्राचार्य एच आर वाघमारे ,सचिव सुधीर मागाडे, संचालक व्ही एम कुलकर्णी, प्रशांत मोरे, दत्तात्रय पाटोळे, प्रा श्री गावडे , अमित वाडेकर ,तानाजी लिंगडे ,सौ स्वप्नजा मोहिते,श्रीमती ज्योती उत्पात या पदाधिकाऱ्यांसह सभासद बंधू भगिनी सभेस उपस्थित होते.
सर्व साधारण कर्जाची मर्यादा रुपये 14 लाख करण्यात आली आणि तातडी कर्जाची मर्यादा दोन लाख ठेवण्यात आली. व्याजदर दर साल दर शेकडा आठ टक्के इतका ठरवण्यात आला आणि सात टक्के लाभांशाला सर्वसाधारण मंजुरी दिली.