कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक जयंती निमित्त सुपंत गौरव पुरस्कार २०२४ चे आयोजन
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०९/२०२४- एकवीरा ज्येष्ठ महिला नागरिक संघ गोपाळपूर (फेस्कॉम) शाखा येळे वस्ती पंढरपूर आयोजित कर्मयोगी वै.सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंतीनिमित्त सुपंत गौरव पुरस्कार २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.
या समारंभाचे अध्यक्षस्थानी मा.आमदार प्रशांत परिचारक असून दिप प्रज्वलन मिलिंद परिचारक मा.प्राचार्य उमा महाविद्यालय यांच्या हस्ते होणार आहे.प्रतिमा पुजन मा. चेअरमन दिनकर मोरे श्रीपूर स.सा. कारखाना यांच्या हस्ते होणार आहे.
ह.भ.प.डॉ.जयवंत बोधले महाराज, सिध्दार्थ ढवळे सर , ॲड.वामन माने सर,मदन महाराज हरिदास यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहेत.

चेअरमन सतिश मुळे अर्बन बँक ,यशवंत कुलकर्णी एम.डी. श्रीपूर स.सा.कारखाना, रा.पा.कटेकर अध्यक्ष मुक बधीर विद्यालय, अमरजीत पाटील सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे तर सन्मानीय उपस्थिती माजी नगरसेवक लक्ष्मण शिरसट,अनिल अभंगराव सर, राजू बापू गावडे, सुभाष मस्के सर,सी. एन. देशपांडे यांची राहणार आहे.
गुडटच बॅडटच यासंदर्भात सौ.मिराताई परिचारक या प्रमुख व्याख्यात्या आहेत.
निर्भय कन्या फलक अनावरण सौ.डॉ. वर्षाताई काणे, सौ.माधुरी जोशी पाटील, सौ. स्मिता अधटराव, सौ.सुप्रिया बहीरट,सौ. स्वाती डोंबे, डॉ सौ.संगिता पाटील यांच्या हस्ते होणार आहे.स्वागत गीत सौ.सुनिता जवंजाळ कलामंच यांच्यावतीने होणार आहे.
डॉ.शितल कांतीलाल शहा, डॉ. प्रविदत्त प्रभाकर वांगीकर ,हणमंत संभाजी कुंभार, सौ.यामिनीताई केदार जोशी,सौ. सुरेखाताई दिलीप गुरव,सौ.कस्तुरीताई महेश म्हेत्रे सौ,अंजली सदानंद डिंगरे, ॲड. महेश वसंतराव कसबे,सौ.गौरी वैभव पोले, सौ. विनया संकेत कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सौ.अंजलीताई डिंगरे कलामंच गट पसायदान म्हणणार आहेत.आभारप्रदर्शन सौ.सुप्रिया सलगर, सुप्रिया फाऊन्डेशन अहिल्या महिला स्व.सा गट करणार आहे.
रविवार दि.०६/१०/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. उमा महाविद्यालय,पंढरपूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन चंदाताई तिवाडी अध्यक्ष, सौ.सुरेखा दिलिप गुरव सल्लागार आणि उपाध्यक्ष कमलताई तोंडे यांनी केले आहे.