द.ह.कवठेकर प्रशालेस ई लर्निंग सेट ची मौल्यवान भेट
सुतत्ती एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून ई लर्निंग सेट प्रदान
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०९/२०२४- सुतत्ती एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी.एस.आर.मधून रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्ट च्यावतीने रोटरी ई लर्निंग सेट प्रोजेक्ट अंतर्गत द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर विद्यालयामध्ये ई लर्निंग सेट बसविण्यात आला.
यामध्ये मोठा दुरचित्रवाणी संच उपलब्ध करून देण्यात आला आहे. या दूरचित्रवाणी संचाच्या माध्यमातून त्यामध्ये असलेल्या शैक्षणिक सॉफ्टवेअर च्या साह्याने वर्गामध्ये शिकणे व शिकविणे ही प्रक्रिया अधिक सोपी तसेच मनोरंजक बनणार आहे.या दूरचित्रवाणी संचामध्ये इयत्ता पहिली ते दहावी चा संपूर्ण अभ्यासक्रम ॲनिमेशनच्या स्वरूपात दिलेला आहे.याद्वारे विद्यार्थ्यांना अधिक परिणामकारकपणे शिक्षण देता येणार आहे.ॲनिमेशनच्या माध्यमातून संकल्पना स्पष्ट करणे आणि समजावून घेणे अधिक सोयीस्कर बनणार आहे.
पंढरपूर येथील द.ह.कवठेकर प्रशाला हे मराठी माध्यमाचे दर्जेदार विद्यालय म्हणून ओळखले जाते.विद्यालयाला उत्कृष्ट निकालाची परंपरा आहे.विद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थी आहेतच तसेच गरजू कुटुंबातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला घरी ई लर्निंग च्या माध्यमातून शिक्षण घेणे शक्य नाही म्हणून विद्यालयातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हे ध्येय मनात ठेवून हा उपक्रम राबविला जात आहे.
विद्यालयामध्ये ई लर्निंग सेट बसवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्ट चे ज्येष्ठ रोटेरियन पंकज पटेल यांचे सहकार्य लाभले. तसेच या प्रोजेक्टसाठी शेखर राजुरकर यांनी समन्वय साधला.