पंढरपूर उपनगरातील बेकायदेशीर जनावरांचे गोठे शहराबाहेर काढा – यशवंत जगन्नाथ डोंबाळी
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूरातील उपनगरांमध्ये रहिवासी भागात अनेक बेकायदेशीर जनावरांचे गोठे आहेत . उपनगरामध्ये गोठ्यांचे मालक झुंडीने जनावरे पळवत नेत असतात . त्यामुळे जेष्ठ नागरिकांना रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे.लहान मुलामुलींनाही या जनावरांपासून धोका संभवत असल्याने भितीमुळे घराबाहेर खेळता येत नाही.
तसेच जनावरांच्या शेणामुळे वाहने , नागरिक घसरून अपघातही होत आहेत.घाणीमुळे दुर्गंधी पसरल्याने डासांचे व किटकांचे प्रमाणही वाढलेले आहे .सहयोगनगरवासियांना या त्रासाला सामोरे जावे तर लागत आहेच वरून जनावरांच्या मालकांची अरेरावीही सहन करावी लागत आहे.

नगरपालिकेस निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जातेय
नगरपालिकेस निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे पंढरपूरच्या उपनगरातील निवासी वसाहतीतील बेकायदेशीर जनावरांचे गोठे तात्काळ शहराबाहेर न्यावेत अन्यथा जनआंदोलन स्फूर्ती फाउंडेशनच्यावतीने उभे करण्यात येईल असा स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी इशारा दिला आहे.