काँ.सीताराम येचुरी यांनी आयुष्यभर गरीबांना,वंचितांना ताकद देण्याचे काम केले – सुशीलकुमार शिंदे
कॉ.सीताराम येचुरी यांना अखेरचा क्रांतिकारक लाल सलाम

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०९/२०२४- भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ.सीताराम येचुरी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.आज रोजी भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभेचे दत्तनगर येथील कार्यालयात आयोजित केले होते.

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांच्या प्रतिमेस फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
