मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेऊन केली आरती….

मुंबई/पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ :कोरोना नंतर गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होत आहे. तसाच उत्साह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दिसत आहे.देशातील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, सामान्य नागरिक यांनी वर्षावर जाऊन दर्शन घेतले आहेत. काल विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले व त्यांच्या हस्ते आरती देखील झाली.

डॉ. गोऱ्हे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी खा.श्रीकांत शिंदे, आ.सदा सरवणकर, आ.दिलीप लांडे, माजी आ.राम पाटील, गोपकिशन बाजोरिया, शिवसेना उपनेत्या कला शिंदे आदी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
