ध्येय पर्यटन स्थळ निर्मितीचे, वृक्षारोपण निसर्ग सौंदर्याचे, भविष्य फल प्राप्तीचे

ध्येय पर्यटन स्थळ निर्मितीचे, वृक्षारोपण निसर्ग सौंदर्याचे, भविष्य फल प्राप्तीचे

सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर येथे पर्यटन स्थळ निर्माण विकास कार्य वेगाने पुढे जात आहे. गावातील प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत आहे.

गुरुवार दि 12-9-24 रोजी भास्कर बाबुराव भोसले यांनी दिलेल्या 50 केशर आंब्यांच्या रोपा पैकी 25 रोपे सरकोली पर्यटन स्थळावरील टीचर्स गार्डन,सनसेट पॉईंट,जय जवान जय किसान स्थळावर जैन समाजाचे प्रवचनकार जयकुमार पंडीत गुरुजी मिरज यांच्या व उपस्थित गावकरी बांधवांच्या, लहान मुलांच्या शुभहस्ते लावण्यात आली.

सरकोली ता पंढरपूर पर्यटन स्थळावर जास्तीत जास्त फळांची रोपे लागवड करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.याच कारण कोणत्याही झाडांना पाणी सुर्य उर्जा, जागा, तेवढीच लागणार आहे.फक्त फळांची रोपांची किंमत इतर जंगली रोपांपेक्षा जास्त असते.फळांच्या रोपांबरोबर आर्युवेदीक आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्माण करणार्या वृक्षांचीही लागवड करीत आहोत.गावातील बंधू भगिनी, माहेरवाशीण मुली, पर्यटक, लहान मुले यांना पर्यटन स्थळावर आल्यावर प्रत्येक सिझन मध्ये फळ मिळावे हा प्रमुख उद्देश आहे. याबरोबरच पक्षी, किटक, फुलपाखरे, मधमाश्यांना फळा फुलांचा लाभ मिळावा. येथील फळांच्या बियांपासून पुढे लाखो रोपांचे बिजारोपन व्हावे व इथे येणाऱ्यांना परत जाताना एक तरी रोप पर्यटन स्थळ निर्मितीच्या वतीने भेट देता यावे अशी अनेक उद्दिष्टे आम्ही ठेवली आहेत.त्या करीता सर्वांचेच सहकार्य, मार्गदर्शन,‌ वेगवेगळ्या स्वरूपात मदत मिळत आहे.आमचे पर्यटन सेवेकरी उन वारा पाऊस थंडी याची तमा न बाळगता श्रमदान करीत आहेत.इथल्या श्रमदाचा आनंद आमची उर्जा वाढवतो. अनेक सेवाकार्यापैकी निसर्ग सेवा ही पृथ्वीचे तापमान, पर्यावरण संतुलन, स्वच्छ हवा, सावली,मानव, पशुपक्षी,किटक फुलपाखरे यांना अन्न निर्माण करण्यासाठी मदत करते अशा विवधतेसाठी उत्कृष्ट सेवा आहे.ही सेवा मानव जन्मात सर्वांकडून घडावी ही अपेक्षा व्यक्त करतो असे विलास श्रीरंग भोसले मा.पोलीस अंमलदार सरकोली 9923433535 यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top