पंढरपूर नगरपरिषद व लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने लोकमान्य विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा

पंढरपूर नगरपरिषद व लायन्स क्लब पंढरपूरच्यावतीने लोकमान्य विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर नगर परिषद व लायन्स क्लब पंढरपूर च्या वतीने लोकमान्य विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय आराध्ये सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रथम डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात झाली.

याप्रसंगी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला व आज आम्ही जे घडलोय ते केवळ आमचे शिक्षक ,गुरुजन व आमचे माता पिता यांच्या मार्गदर्शनाने, आशीर्वादाने घडलो असल्याचे सांगितले.

झोन चेअरमन विवेक परदेशी यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच शिक्षक हे देश घडवत असतात.आज शिक्षक दिनानिमित्त आम्हाला सर्व शिक्षकांचा सन्मान करायला मिळाले हे आम्ही आमचे भाग्य समजतो असे प्रतिपादन केले.

राजीव कटेकर व विठ्ठल केसकर यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अभय आराध्ये ,अभय थिटे, प्रमोद पुरी,आनंद ओंबासे, दीपक इरकल, लहू डांगे, रवींद्र पवार, श्रीमती साखरे मॅडम, सौ हर्षदा ताठे,धनंजय मिसाळ,मालोजी भोसले,मनोज बोधले ,भास्कर कोकरे, इस्माईल पठाण,सौ तेजस्विनी स्वामी, सौ रेश्मा जमदाडे,सौ सुनिता लालबोंद्रे,सौ स्वाती जहागीरदार, जयसिंग वागज,अरुण लोंढे, संतोष कारंडे यांचा सत्कार करण्यात आला तर योग प्रचाराचे व योग शिक्षणाचे चांगले कार्य केल्याबद्दल व करत असल्याबद्दल योगशिक्षक ॲड सुनील वाळूजकर,शाहूराजे जाधव, प्रशांत आगावणे, रवींद्र कोडक, विवेक परदेशी, विठ्ठल केसकर, चंदुलाल सुपेकर यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे,नगर अभियंता नेताजी पवार, अभिलाषा नेरे, लायन्स क्लब सेक्रेटरी ओंकार बसवंती, खजिनदार शोभा गुप्ता, राजीव कटेकर, विवेक परदेशी, अँड भारत वाघुले, डॉ अश्विनी परदेशी,सुरेखाताई कुलकर्णी,सचिन माने,देविदास कसबे, सतीश निपाणकर, वैभव सुपेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती जहागीरदार मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार संस्कृतिक विभाग प्रमुख दिपक इरकल यांनी मांडले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे, सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top