२०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेला… स्वप्नील कुसळे
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०९/२०२४- २०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेला भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आला होता.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनानंतर त्याने सांगितले की श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनावेळी माझ्या खेळामुळे देशाचे नाव उज्ज्वल व्हावे अशी प्रार्थना केली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनानंतर पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी आणि कांस्यपदक विजेता भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळे यांचे स्नेही उपस्थित होते.
