सोनालीका कंपंनीची जुन जॅकपॉट लकी ड्रॉ सोडत समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे संपन्न

सोनालीका कंपनीची जुन जॅकपॉट लकी ड्रॉ सोडत समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे संपन्न

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- समृद्धी ट्रॅक्टर पंढरपूर येथे सोनालीका ट्रॅक्टर कंपंनीच्या जुन जॅकपॉट लकी ड्रॉची सोडत दि २ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. या जुन जॅकपॉट लकी ड्रॉ मध्ये जुन महिन्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ घेण्यात आला होता. यामध्ये प्रथम बक्षीस 65HP CRDS 4WD ट्रॅक्टर, द्वितीय बक्षीस टाटा पंच कार, तृतीय बक्षीस रॉयल एनफील्ड बुलेट, चौथे बक्षीस होडा शाईन गाडी, पाचवे बक्षीस LED TV, सहावे बक्षीस मोबाइल फोन आणि सातवे बक्षीस रिस्ट वॉच ही लकी ड्रॉ ची सोडत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

यामध्ये समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथील ग्राहक बिराप्पा माळी रा.मंगळवेढा हे रॉयल एनफील्ड बुलेटचे विजेते ठरले आहेत. कृष्णा पडळकर रा.कासेगाव हे होंडा शाईन गाडीचे विजेते ठरले आहेत.श्रीमंत बिराजदार,रा. चिकलगी हे मोबाइलचे विजेते ठरले, त्याचबरोबर तुकाराम सावंत रा.जवळा हे रिस्ट वॉचचे विजेते ठरले आहेत.

या सर्वांचे धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी अभिनंदन केले. या येणार्‍या सणासुदी निमित्त हेवी ड्यूटी धमाका या नवीन लकी ड्रॉ स्कीमची घोषणा करण्यात आली.ही स्कीम दि.15 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर 2024 रोजी ट्रॅक्टर खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी देण्यात आली. यामध्ये प्रथम बक्षीस 65HP CRDS 4WD ट्रॅक्टर, द्वितीय बक्षीस टाटा पंच कार, तृतीय बक्षीस 25gm सोन्याचे नाणे, चौथे बक्षीस रॉयल एनफील्ड बुलेट,पाचवे बक्षीस रोटावेटर, सहावे बक्षीस होंडा शाईन गाडी, सातवे बक्षीस वाशिंग मशीन,आठवे बक्षीस LED TV, नववे बक्षीस मोबाईल फोन, दहावे बक्षीस ज्यूसर मिक्सर आणि अकरावे बक्षीस रिस्ट वॉच असे एकूण 11,011 भेटवस्तु जिंकण्याची सुवर्ण संधी आहे याचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी फायदा घ्यावा असे आवाहन धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी पंढरपूर – मंगळवेढा – सांगोला येथील सर्व शेतकर्‍यांना केले आहे.

यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के,सोनालिका कंपनीचे टेरिटरी मॅनेजर ओंकार कोळी,समृद्धी ट्रॅक्टरचे मॅनेजर सोमनाथ केसकर तसेच शेतकरी बांधव व समृद्धी ट्रॅक्टर चा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top