कासेगाव येथे विचारविनिमय बैठकीत वसंत देशमुख यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशी समर्थकांची मागणी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांना भेटून मागणी करणार : वसंत देशमुख

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवावी अशी मागणी वारंवार कार्यकर्त्यांकडून होत असल्याने आपण विचार विनिमय बैठकीच्या माध्यमातून समर्थकांचा निर्णय घेतला असून लवकरच शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते वसंत देशमुख यांनी दिली.

पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन तथा कासेगाव जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य वसंत देशमुख यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करण्यासाठी कासेगाव ता.पंढरपूर येथे विचारविनिमय बैठकीचे आयोजन करून कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली.

यावेळी वसंत देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि दिग्गज नेते मंडळींनी वसंत देशमुख यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका मांडली.

या विचारविनिमय बैठकीच्या निमित्ताने वसंत देशमुख यांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.यावेळी व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, दीपक वाडदेकर, नगरसेवक सुरेश नेहतराव, माजी नगरसेवक महंमद उस्ताद यांच्यासह पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघातील राजाभाऊ कडलासकर, नाथा काशीद, सुशांत माने, विठ्ठल झांजे, शिवाजी कोळेकर, नागेश कस्तुरे, इरेश जोंधळे ,संजय राठोड, आबा हंडे, संतोष माने, अण्णा पाटील, शरद गावडे मंगळवेढा तालुक्यातील सरपंच ,उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध सोसायटींचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य व नेते मंडळी तसेच वसंत देशमुख प्रेमी कार्यकर्ते,ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
