तणावमुक्त राहण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान व सुदर्शन क्रिया कोर्सची आवश्यकता:- अँड सुनील वाळूजकर

पंढरपूर मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग आयोजित हॅपिनेस कोर्स वर्गाला सुरुवात

तणावमुक्त राहण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान व जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया कोर्सची आपल्याला आवश्यकता:- अँड सुनील वाळूजकर

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – आर्ट ऑफ लिविंग संस्था संचलित हॅपिनेस प्रोग्रॅम अंतर्गत सुदर्शन क्रिया या वर्गाचे उद्घाटन पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्यधिकारी अधिकारी अँड सुनील वाळूजकर,अँड रामलिंग कोष्टी यांच्या हस्ते पार पडले .

अँड सौ वंदना कोष्टी,संतोष भोसेकर,डॉ सचिन सावंत,डॉ कन्हैया कुंभार, मा. नगरसेवक विवेक परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सावरकर वाचनालय पंढरपूर येथे पार पडले.

याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे टिचर डॉ अतुल फुले यांनी सांगितले की आर्ट ऑफ लिव्हिंग संचलित हॅपिनेस कोर्स मधे शिकवली जाणारी सुदर्शन क्रिया ही परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांनी जगाला दिलेली एक अनमोल भेट आहे. या सुदर्शन क्रियेमुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते व शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, समाधानी राहण्याची वृत्ती वाढते व आनंदी जीवन जगण्याची ती गुरुकिल्ली आहे .

तणावमुक्त राहण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान व सुदर्शन क्रिया सारख्या महत्वपूर्ण कोर्सची आपल्याला अत्यंत आवश्यकता असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड सुनील वाळूजकर यांनी सांगितले व नेहमीच प्रथम प्राधान्य योग, प्राणायाम, ध्यान व व्यायामाला दिला पाहिजे असे प्रतिपादन केले .

सौ वंदना कोष्टी मॅडम यांनी आपण नित्यनियमाने योग प्राणायाम केले पाहिजे असे सांगत सर्व उपस्थित साधकांना एक नवीन अनुभूती मिळेल यात शंका नाही असे म्हटले व जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया सारख्या महत्त्वपूर्ण कोर्ससाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल सर्व साधकांना शुभेच्छा दिल्या.

संतोष भोसेकर यांनी सर्व साधकांना शुभेच्छा दिल्या व सावरकर वाचनालय येथे होत असलेल्या कार्याचा आढावा दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक परदेशी यांनी केले.आभार सचिन सावंत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top