अष्टयाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्मवीरमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटचे दिमाखदार संचलन

अष्टयाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्मवीरमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटचे दिमाखदार संचलन

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज– रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात अष्टयाहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात येवून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लेफ्टनंट डॉ. समाधान माने, क्रीडा शिक्षक प्रा. विठ्ठल फुले उपस्थित होते. राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटनी यावेळी दिमाखदार संचलन करून तिरंगा ध्वजास मानवंदना दिली.

महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या ध्वजारोहण समारंभात राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटनी केलेल्या संचलनाचे परेड कमांडर म्हणून सिनिअर ऑफिसर पृथ्वीराज गुरव, प्लाटून कमांडर ज्युनिअर अंडर ऑफिसर सुरज पवार, कंपनी सार्जंट मेजर सोहम झांबरे, सिनिअर अंडर ऑफिसर श्रेया संगीतराव आणि ज्युनिअर अंडर ऑफिसर सिद्धी लिगाडे यांनी उत्तम प्रकारे नेतृत्त्व केले.

ध्वजारोहण समारंभास महाविद्यालयातील कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.भगवान नाईकनवरे, शास्त्र विभागाचे उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, कॉमर्स विभागाचे उपप्राचार्य डॉ. तुकाराम अनंतकवळस, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ.अनिल चोपडे, जुनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. विठ्ठल काटकर, सिनिअर, ज्युनिअर व व्होकेशनल विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी- विद्यार्थिनी, माजी सेवक, रयत प्रेमी व पालक हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी अडतीस महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मुथाप्पा ॲडम, ऑफिसर कर्नल विक्रम जाधव आणि सुभेदार मेजर अरुण कुमार ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर सेवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top