उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली चर्चा
मनसेच्या मागणीला यश..
पंढरपूर नगरपालिका शाळा इमारत दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याचे दिले शिक्षण मंत्र्यांनी आदेश .. लवकरच नगरपालिका शाळा होणार चकाचक ..
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मुंबई येथे मंत्रालयातील दालनात भेट घेतली.
यावेळी पंढरपूर शहरातील, उपनगरातील रस्ते आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या असणाऱ्या विविध अडचणी, पाणी प्रश्न तसेच शिवडी मतदारसंघातील विविध विषयावर चर्चा करून ही कामे मंजूर करण्यासाठी विनंती केली आणि निवेदन दिले.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हे प्रश्न तातडीने सोडविणार असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे,कौस्तुभ लिमयें आदी उपस्थित होते.
तर महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी भेट घेतली.

यावेळी पंढरपूर शहरातील नगरपालिका चालवत असलेल्या शाळांच्या अवस्था दयनीय झाल्या असून इमारती खराब झाल्या आहेत. कोणत्याही सोयी सुविधा नाहीत.त्या सर्व शाळा दुरुस्त करण्यासाठी दहा कोटी रुपये निधीची मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी लेखी पत्राद्वारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली.

यावेळी तात्काळ निधी मंजूर करण्याचे आदेश दीपक केसरकर यांनी संबंधितांना दिले आहेत.