अखिल भारत हिन्दुमहासभा पंढरपूरच्या वतीने अखंड हिन्दुस्थान दिना निमित्त मशाल मिरवणुक
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०८/२०२४- अखिल भारत हिन्दुमहासभा पंढरपूरच्या वतीने अखंड हिन्दुस्थान दिना निमित्त मशाल मिरवणुक काढण्यात येणार आहे.
दि.१४ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ७ वाजता हिन्दुभहासभा भवन, महाव्दार पंढरपूर येथून ही मिरवणूक निघेल.या मिरवणुकीचा मार्ग महाव्दार – पश्चिमव्दार – चौफाळा – प्रदक्षिणा रोड – चौफाळा – वि.सावरकर पथ – वि.दा. सावरकर चौंक असा असणार आहे.
तरी सर्व बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारत हिन्दुमहासभा पंढरपूरच्या वतीने करण्यात आले आहे.या मिरवणुकीचे संयोजन हिंदु महासभा, रा.स्व.संघ,शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान,बजरंग दल यांच्यावतीने करण्यात आले आहे.