महामंडळ महा Expo
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,११/०८/२०२४ – स्वराज्य च्या दुसऱ्या वर्धापनदिना निमित्त सर्व जाती व धर्मातील लोकांना व्यावसायिक अनुदान व ०% व्याज दराने व्यावसायिक कर्ज सहजपणे उपलब्ध व्हावे म्हणून महामंडळ महा EXPO चे आयोजन बुधवार दि. १४/०८/२०२४ सकाळी ०९.०० ते ०५.०० वा. करण्यात आले आहे.
महामंडळ महा EXPO मध्ये उपलब्ध सुविधा
१) महामंडळ समन्वयक
२) सर्व बँक कर्ज प्रतिनिधी
३) सर्व वाहन विक्रेते
४) सर्व प्रकारची व्यावसायीक वाहने प्रात्यक्षिक
५) सर्व शासकीय दाखले काढण्यासाठी महा-ई सेवा केंद्र
६) प्रोजेक्ट रिपोर्ट साठी CA
७) नोटरी पब्लिक

५० हजार ते ५० लाख व्याज परतावा कर्ज व अनुदान
महाराष्ट्र शासनाची सर्व जातींची महामंडळे एकत्र
संपर्क – १) आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
२) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ
३) मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ
४) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ
५) महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
६) महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ
७) वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
८) इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ
९) राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
१०) पैलवान कै.मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ
११) संत काशिबा गुरव आर्थिक विकास महामंडळ
जगद्वयोती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ १३) संत सेना महाराज केशशिल्पी आर्थिक विकास महामंडळ
सर्व जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज
महिला बचत गटांना स्वतंत्र बिनव्याजी कर्जपुरवठा
तरी या महामंडळ महा EXPO ला भेट द्यावी अशी विनंती प्रा. महादेव तळेकर सर यांचेवतीने करण्यात आली आहे.रायगड लॉन्स्,भोसे ता.पंढरपूर येथे या महामंडळ महा EXPO चे आयोजन करण्यात आले आहे.