सोलापूर:- स्वातंत्र्य सैनिक नगर ते डब्ल्यू आय टी सोलापूर रस्त्यावरील स्ट्रीट लाईट कधी सुरू होणार? गेल्या दोन महिन्यापासून लाईट्स पहाटे बंदच असतात. या रस्त्यावर पहाटे महिला तसेच वृद्ध ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉक साठी फिरत असतात परंतु स्ट्रीट लाईट बंद असल्याने समोरचे काही दिसत नाही त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तसेच अंधाराचा फायदा घेऊन लूटमार होण्याची शक्यता देखील व्यक्त होत असून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी याबद्दल AR न्यूज चैनल कडे तक्रार केली असून या गोष्टीकडे सोलापूर महानगरपालिकेने त्वरित लक्ष घालून सदरील स्ट्रीट लाईट ताबडतोब सुरू करावेत. या तक्रारीकडे लक्ष दिले नाही तर ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींचा मोर्चा महापालिकेवर काढण्यात येईल असा इशारा ज्येष्ठ नागरिकांनी दिलेला आहे तरी महानगरपालिकेने ताबडतोब लक्ष घालून सदरील स्ट्रीट लाईट सुरू कराव्यात.





