सोलापूरमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसतर्फे बाबासाहेबांना अभिवादन

सोलापूरमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसतर्फे डॉ बाबासाहेबांना अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर काँग्रेसतर्फे डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

डॉ.आंबेडकरांना काँग्रेसचा सलाम; शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली अभिवादन कार्यक्रम संपन्न

सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१२/२०२५ –भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे नेतृत्व शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले.त्यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समाजमुक्‍तीच्या महामानवाला आदरांजली देण्यात आली.

यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, अरिफ शेख, सुशीलाताई आबुटे, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, प्रविण निकाळजे,विनोद भोसले,महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, मागासवर्गीय विभागाध्यक्ष उमेश सुरते, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, बाबुराव म्हेत्रे,मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना,रोजगार स्वयंरोजगार सेल अध्यक्ष राजेंद्र शिरकुल,माजी नगरसेवक एन.के.क्षिरसागर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महिला-अध्यक्ष, युवक विभाग, सेवादल, कामगार सेल आणि विविध प्रकोष्ठातील पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहून बाबासाहेबांना सामूहिक अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर काँग्रेसने सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

Leave a Reply

Back To Top