जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती भंडीशेगाव शाळेत शिक्षण सप्ताह साजरा
शेळवे /संभाजी वाघुले –शिक्षण सप्ताह अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती भंडीशेगाव ता.पंढरपूर जि.सोलापूर या ठिकाणी 22 जुलै ते 28 जुलै 2024 पर्यंत अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती,मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस,इको क्लब दिवस आणि समुदाय सहभाग दिवस व स्नेहभोजन असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
यामध्ये विद्यार्थी ,शिक्षक,माता पालक व वस्तीवरील ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रम पार पाडला. शिक्षण सप्ताहाचा समारोप विद्यार्थ्यांना ग्रामस्थांतर्फे स्नेहभोजन देऊन करण्यात आला. यासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, केंद्रप्रमुख श्रीमती रासकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
हा उपक्रम सफल करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण सेवानिवृत्त अधिकारी व पालक वर्गाचे योगदान लाभले.शिक्षक केशव राठोड व अरविंद वळवी यांनी मेहनत घेऊन हा उपक्रम शाळेत राबविला.