सांगलीत चंदुकाका सराफ ज्वेल्स् येथे कर्मवीर मल्टीस्टेट चे कक्ष सुरू

सांगलीत चंदुकाका सराफ ज्वेल्स् येथे कर्मवीर मल्टीस्टेट चे कक्ष सुरू

सुविधा केंद्राचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर, व्हा.चेअरमन प्रा.आप्पा भगाटे व चंदुकाका सराफ ज्वेल्सचे शाखा व्यवस्थापक अमोल दानोळे आणि संस्थेचे सर्व संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

सांगली/ ज्ञानप्रवाह न्यूज- कर्मवीर मल्टीस्टेट, जयसिंगपूर व चंदूकाका सराफ ज्वेल्स् यांच्या संयुक्त विद्यमाने विश्रामबाग, सांगली येथील चंदूकाका सराफ ज्वेल्स् या शोरूम मध्ये कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेचे कर्ज सुविधा केंद्र सुरू करण्यात आले.

सुविधा केंद्राचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर, व्हा.चेअरमन प्रा.आप्पा भगाटे व चंदुकाका सराफ ज्वेल्सचे शाखा व्यवस्थापक अमोल दानोळे आणि संस्थेचे सर्व संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या सुविधा केंद्रांमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी व संस्थेच्या सभासदांसाठी तात्काळ सोने तारण कर्ज व सुवर्ण खरेदीसाठी अत्यंत सोपी कर्ज सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मासिक परतफेड होणाऱ्या कर्जास केवळ 5.5% इतक्या अल्प व्याजात कर्ज उपलब्ध होणार आहे. तर सुवर्ण खरेदीसाठी 3 लाखापर्यंतचे कर्ज 5% इतक्या अल्प व्याजात कर्ज उपलब्ध होणार आहे.

संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर यांनी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या नावे मंगळसूत्र कर्ज योजना संस्थेकडून सुरू केल्याचे सांगितले. या योजनेत पाच ग्रॅम पर्यंतचे मंगळसूत्र घेण्यासाठी कोणताही नफा न घेता हे कर्ज महिलांसाठी उपलब्ध केले आहे.त्याचा लाभ महिला भगिनींनी घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. यावेळी त्यांनी या मंगळसूत्र जिन्नसाचे अनावरण केले. शोरूम मध्ये कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेचे सुविधा केंद्र सुरू करण्यास अनुमती दिल्याबद्दल चंदूकाका सराफ ज्वेल्सचे संचालक अतुल शहा,सौ.संगिता अतुल शहा, सिद्धार्थ शहा,आदित्य शहा,योगेश शहा यांचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.आप्पा भगाटे यांनी केले.संचालक भरत गाट,सागर चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. अमोल दानोळे यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील,श्री.अडमूठे सर,बी.के.पाटील सर, चंदुकाका सराफ यांचे ग्राहक व संस्थेचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top