आता पुणे ते मुंबई प्रवास आणखी होणार सोयीस्कर..
पुणेकरांसाठी मेट्रोची २ नवीन स्थानकं..
पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज – पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे पुणे-लोणावळा रेल्वे प्रवाशांचा वाढता ताण कमी होऊन उपनगरीय रेल्वे सेवांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.तसेच पुणे-मुंबई या दोन महानगरांतील दळणवळण अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

पुणेकरांसाठी मेट्रोची २ नवीन स्थानकं..
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानकं उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.बालाजीनगर व बिब्बेवाडी इथं ही दोन मेट्रो स्थानकं उभारली जाणार असून त्यासाठी अतिरिक्त खर्चास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे पुणे शहरातील दक्षिण भागातील नागरिकां साठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ होणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. त्याच प्रमाणे पुणे मेट्रो टप्पा-२ चा विस्तार अधिक कार्यक्षम होऊन पुणेकरांना आधुनिक,जलद व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.
