ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस अलंकार परिधान
राधाष्टमीनिमित्त मंदिरातील श्री राधिका मातेस पांढरा पोशाख व सोन्या मोत्याचे अलंकार व गुलाल टाकून जन्मोत्सव साजरा

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.31:- ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त श्री विठ्ठलास सोने मुकुट, कौस्तुभ मणी,दंडपेट्या जोड,हि-याचा कंगनजोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, शिरपेच, मत्स्य जोड, तोडे जोड, मोहनमाळ, मोहरांची माळ, तुळशीची माळ, नाम निळाचा तसेच श्री रूक्मिणीमातेस सोने मुकुट,वाक्या जोड, तोडे जोड,तानवड जोड,चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा,लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी,कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते.

आज राधाष्टमी (श्री राधिक मातेचा जन्म दिवस) असल्याने मंदिरातील श्री राधिका मातेस पांढरा पोशाख व सोन्या मोत्याचे अलंकार परिधान करण्यात आले व गुलाल टाकून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये सोन्याचा नक्षी टोप,मोत्याचा कंठा, खड्याचा पाटल्या जोड,मोत्याचे मंगळसुत्र, बाजीराव गरसोळी इत्यादी अलंकाराचा समावेश आहे.यावेळी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.प्रकाश जवंजाळ व विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते.तसेच रात्री 8.00 वाजता श्री राधिकामाते समोर भजन केले जाणार आहे.

