चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य श्री 108 शांतिसागरजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

आचार्य श्रींच्या कठोर तपश्चर्येबाबत, समाजाच्या उध्दारासाठी केलेले प्रयत्न आणि जीवन चरित्रावरती टाकला प्रकाश

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- चारित्र्य चक्रवर्ती, धर्मसाम्राज्य नायक विसाव्या शतकातील प्रथम आचार्य श्री 108 शांतिसागर जी महाराज यांच्या 70 वी पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर येथे वक्तृत्व स्पर्धेचे दि.24/08/ 2025 रोजी श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महाद्वार या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन महालक्ष्मी उद्योग समूहचे प्रमुख आर के दोशी व सकल जैन समाज यांच्यावतीने करण्यात आले होते.

त्यावेळी सकल जैन समाजातील विद्यार्थ्यांनी व श्रावक श्राविकांनी आचार्य श्रींच्या कठोर तपश्चर्येबाबत,जैन समाजा च्या उध्दारासाठी केलेले प्रयत्न आणि जीवन चरित्रावरती प्रकाश टाकला.या कार्यक्रमाप्रसंगी आर के दोशी,डॉ. राजेश फडे,अरुण खडके,सुरेश देशमाने,सुधाकर देशमाने, अजय शहा, शितल खडके,श्री.गाडे तसेच अतिशय क्षेत्र श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महाद्वार चे विश्वस्त व त्यांचे सर्व सहकारी यांच्या सानिध्यात कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन अजय शहा पेणूरकर यांनी केले.प्रथम आचार्य श्री 108 शांतिसागर जी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित या वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना आर.के.दोशी महालक्ष्मी उद्योग समुह पंढरपूर यांच्यावतीने पारितोषिके देवुन सन्मानीत करण्यात आले.


