पालघर पोलीस दलाकडून अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई

पालघर पोलीस दलाकडून अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई

पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज- पोलीस अधीक्षक पालघर यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत.

दि.२२/०८/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पालघरचे पोलीस पथक हे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे अनुषंगाने पेट्रोलींग करत असताना गोपनीय बातमी मिळाली की एक टोयोटा कंपनीची इनोव्हा कार क्रमांक GJ15BB3969 मधून गुजरातच्या बाजूकडून मुंबईकडे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत आहे.

नमूद माहितीच्या आधारे कासा पोलीस ठाणे यांच्या मदतीने कासा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे घोळ गावचे हद्दीतील टोलनाका येथे वाहने चेक करत असताना GJ15BB3969 या क्रमांकाची इनोव्हा कार येत असताना दिसून आली.सदर कार चालकास गाडी बाजूला घेण्यास सांगून त्यास नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव मुकेश लालचंद कश्यप वय २६ वर्षे, रा.गल्ली नं. ४, इंदिरानगर मंडला, मानखुर्द मुंबई असे सांगितले.

नमूद कारमध्ये चेक केले असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीकरीता प्रतिबंधीत असलेला विमल पान मसाल्याच्या व तंबाखूच्या एकूण ९,६९,७५६/- रूपये किंमतीच्या १५ सफेद व निळ्या रंगाच्या गोण्या मिळून आल्या.त्यामुळे कारसह एकूण १९,६९,७५६/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नमूद आरोपीविरुब्द कासा पोलीस ठाणे येथे ११३/ २०२५ भा.न्या.सं. कलम १९३,२२३, २७४,२७५ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२), २७, २३, २६(२) (iv), ३०(२) (३) प्रमाणे सह वाचन नियम 2.3.4. of Food and Safety & Standards (Prohibition & Restrictions on Sales) Regulation 2011 सह वाचन नियम Regulation no.3,1.7 of Food Safety & Standards (Food Products Standards and Food Additives) Regulation 2011 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास हा पोउपनि/पंकज चव्हाण नेमणुक कासा पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख पालघर, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे पालघर,उपविभागीय पोलीस अधिकारी समिर मेहेर जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील स्थानिक गुन्हे शाखा पालघर,पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे कासा पोलीस ठाणे, पोउपनि/पंकज चव्हाण, पोहवा/ प्रदिप गोवारी नेमणुक कासा पोलीस ठाणे, पोअं/नरेश घाटाळ, पोअं/ बजरंग अमनवाड, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी केली.

Leave a Reply

Back To Top