स्त्री आधार केंद्रातर्फे महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम द्वितीय व अंतिम सत्र दि.११ ऑगस्ट रोजी

स्त्री आधार केंद्रातर्फे महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमाचे द्वितीय व अंतिम सत्र दि.११ ऑगस्ट रोजी

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज , दि.९ऑगस्ट :- गणेशोत्सवाच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत राहणाऱ्या महिला स्वयंसेवकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी स्त्री आधार केंद्रातर्फे विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे सार्वजनिक सणांदरम्यान गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांवरील अत्याचार,आपत्ती व धोकादायक परिस्थितींमध्ये स्वयंसेवकांनी प्रभावीपणे काम करण्याची तयारी वाढवणे असे आहे.यात पुणे येथील २० पोलीस ठाण्याच्या दक्षता समितीच्या सदस्या उपस्थित राहणार आहेत.प्रशिक्षणानंतर स्त्री आधार केंद्राचे ओळखपत्र पात्र सदस्यांना दिले जाणार आहे.

पहिले प्रशिक्षण २ ऑगस्ट २०२५ रोजी यशस्वीरित्या पार पडले असून दुसरे प्रशिक्षण सत्र दि.११ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

यावेळी महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा ना.डॉ. नीलम गोऱ्हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. तसेच स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त अपर्णा पाठक यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शन पुढील विषयांवर होणार

डॉ.निना बोराडे – पुणे मनपा आरोग्य अधिकारी
विषय:-सणोत्सवात सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता- महिलांचे विशेष आरोग्य प्रश्न व उपाय

विवेक नायडू – आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक
विषय :- हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सीपीआर (Cardio Pulmonary Resuscitation) कसा द्यावा यावरील प्रात्यक्षिक मार्गदर्शन

लखन गायकवाड –
विषय :- फायर एक्सटिंग्विशरचा योग्य वापर या विषयावर मार्गदर्शन

हा कार्यक्रम सोमवार दि.११ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक रोड न्यू इंग्लिश शाळे समोर दुर्वांकुर हॉटेल समोर पुणे येथे दुपारी २.३० ते ५.०० पार पडणार आहे.

Leave a Reply

Back To Top