गणेशोत्सवात महिला सुरक्षेसाठी स्त्री आधार केंद्रातर्फे विशेष स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम
पुणे/डॉ अंकिता शहा – १९८४ पासून महिलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या स्त्री आधार केंद्रातर्फे यंदाही गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत एस.एम.जोशी सभागृह, पहिला मजला, पत्रकार भवन मागे, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेच्या उपसभापती व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ.नीलम गोऱ्हे असतील.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक आणि विषय:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट येले बॉम्ब शोधक व नाशक पथक
विषय: स्फोटकांवरील नियंत्रण व सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी: बॉम्बस्फोट विरोधी पथकाचा परिचय
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक विवेक नायडू
विषय: शहरी आपत्ती व्यवस्थापन व कायदे संमत कृती: महापालिकेची जबाबदारी व नागरिकांचे अधिकार
अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख पुणे
विषय: सण आणि महिला सुरक्षितता: कायदे संरक्षण यंत्रणा व समाजाची भूमिका
या कार्यक्रमाची पार्श्वभूमी:
गणेशोत्सव काळात पुण्यात आणि महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांतून नागरिक मोठ्या संख्येने येतात.यात चोरी, महिलांची छेडछाड,मुलांचे हरवणे,अपहरण व तस्करी अशा घटनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.यावर प्रतिबंध करण्यासाठी स्त्री आधार केंद्र दरवर्षी महिला स्वयंसेवक घडवून तयार करते. हे प्रशिक्षण त्याच उपक्रमाचा एक भाग आहे.
या कार्यक्रमामध्ये पुणे शहरातील २० पोलीस स्टेशन हद्दीतून ८० महिला स्वयंसेविका निवडल्या जात असून त्यांना स्त्री आधार केंद्राची ओळखपत्रे दिली जातील.हे स्वयंसेवक पोलीस यंत्रणा आणि गणेश मंडळांसोबत समन्वय साधून गर्दीच्या ठिकाणी महिलांचे संरक्षण,हरवलेली बालके, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अशा बाबतीत सहकार्य करतील.
हा उपक्रम गेल्या २३ वर्षांपासून यशस्वीरित्या राबवला जात आहे.गेल्या वर्षीही या प्रशिक्षणामुळे अनेक हरवलेली मुले पालकां पर्यंत सुरक्षित पोहोचवली गेली होती. रांगा नियोजन, स्त्रियांना स्वतंत्र आणि सुरक्षित मार्गदर्शन देणे अशा गोष्टींसाठीही स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क:
स्त्री आधार केंद्र,पुणे संपर्क – ०२० – २४३९४१०३ / ०४
Email- streeaadharkendra@gmail.com
