केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार सोहळा अतिवृष्टीच्या धोक्यामुळे स्थगित -सिद्धार्थ कासारे
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याबद्दल मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या रविवारी दिनांक 28 जुलै रोजी मुंबईत षण्मुखानंद हॉल येथे आयोजित केलेला सत्कार समारंभ अतिवृष्टी च्या धोक्यामुळे स्थगित करण्यात आला आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी आज दिली.
ना.रामदास आठवले यांचा सत्कार सोहळा येत्या ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात येईल. सत्कार सोहळ्याची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली आहे.
भारत सरकारमध्ये तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदी निवड झालेले रामदास आठवले एकमेव रिपब्लिकन नेते ठरले आहेत.त्यांचा सत्कार मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्यावतीने येत्या रविवार दिनांक 28 जुलै रोजी सायन येथील षण्मुखानंद हॉल येथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार होता मात्र 28 जुलै रोजी मुंबईत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा धोका असल्यामुळे जनतेला गैरसोय नसावी म्हणून ना.रामदास आठवले यांचा हा समारंभ सोहळा पुढे ढकलल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सिद्धार्थ कासार यांनी दिली आहे.