महाराष्ट्र विधानसभा तालिकाअध्यक्षपदी आमदार समाधान आवताडे यांची निवड

महाराष्ट्र विधानसभा तालिकाअध्यक्षपदी आमदार समाधान आवताडे यांची निवड

आ.आवताडे यांच्या तालिका सभापती रूपाने मतदारसंघाची संपूर्ण राज्यभर उंचावली मान

मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज – मुंबई येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२५ साठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची विधानसभेच्या तालिकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीच्या मंदिरात पीठासीन अधिकारी (तालिकाध्यक्ष) म्हणून आमदार आवताडे यांना काम करण्याचा हा अनुभव अविस्मरणीय असणार आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी तालिका अध्यक्षावर असते आणि आज पक्षा कडून आमदार समाधान आवताडे यांची तालिकाध्यक्ष पदी या पदावर निवड करण्यात आली असल्याने पंढरपूर-मंगळवेढा विधान सभा मतदारसंघाला मोठा सन्मान प्राप्त झाला आहे.

मला मिळालेल्या या सन्मानजनक जबाबदारी रूपाने महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहाची ऐतिहासिक परंपरा आणि गरिमा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या कामातून करणार आहे.विधिमंडळ तालिका सभापती म्हणून माझी या पदावर निवड झाल्याने माझ्या पंढरपूर-मंगळवेढा विधान सभा मतदारसंघातील जनतेचा लोकशाहीभिमुख मोठा सन्मान झाला आहे. त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे व संपूर्ण सभागृहाचे आभार मानतो – आमदार समाधान आवताडे

Leave a Reply

Back To Top