स्वेरीच्या ३ विद्यार्थ्यांची होम फर्स्ट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत निवड

स्वेरीच्या ३ विद्यार्थ्यांची होम फर्स्ट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत निवड

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०६/२०२५- होम फर्स्ट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये घेतलेल्या निवड प्रक्रियेतून एम.बी.ए.विभागातील ३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी दिली.

होम फर्स्ट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गोपाळपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये घेतलेल्या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून एम.बी.ए. विभागा तील दिपक दत्तु नाईकनवरे, ज्ञानेश्वर युवराज कदम व ऋषिकेश शामसुंदर कोरडे या ३ विद्यार्थ्यांची निवड केली.१९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमधून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.

सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे,संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले,उपाध्यक्ष सुरेश राऊत तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी होम फर्स्ट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू मधून निवड झालेल्या तीनही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे..

Leave a Reply

Back To Top