मंगळवेढ्यात संजय गांधी निराधार योजना विभागाचा कार्यभार कविता पुरी यांनी स्विकारला
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी : मंगळवेढा तहसिल कार्यालयामधील संजय गांधी निराधार योजना विभागात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कविता पुरी यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
कार्यभार स्विकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी निराधार लोकांना आपण तत्परतेने न्याय देणार असल्याचे सांगितले.

येथील सहाय्यक महसूल अधिकारी गुणवंत वाघमोेडे यांची नुकतीच पंढरपूर येथे बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.सोलापूर येथे करमणूक विभागात कार्यरत असलेल्या कविता पुरी यांची मंगळवेढा संजय गांधी निराधार योजना विभागाकडे बदली झाली आहे. त्या मुळच्या सोलापूरच्या असून 2007 मध्ये त्यांची निवड मंडळामार्फत शासकीय सेवेत नियुक्ती झाली आहे.आत्तापर्यंत त्यांनी माढा,करमाळा,उत्तर सोलापूर आदी ठिकाणी उत्तमरित्या सेवा बजावलेली आहे.