मंदिर सुरक्षा रक्षक,आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना सीपीआर व गुड समारिटन अ‍ॅप बाबत प्रशिक्षण

मंदिर सुरक्षा रक्षक तसेच पंढरपूर आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना सीपीआर व गुड समारिटन अ‍ॅप बाबत प्रशिक्षण

आषाढी यात्रेत वारकरी व भाविकांना 108 रुग्णवाहीके व्दारे आरोग्य सेवा देण्यात येणार

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०६/२०२५ : आषाढी यात्रेत येणार्‍या वारकरी व भाविकांना आरोग्य सेवा वेळेत देता याव्यात याकरीता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कामगार सुरक्षा रक्षकांना व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना गुड समारिटन मोबाईल अ‍ॅप व कार्डिैओपल्मोनरी रिसक्सटिशन (सीपीआर) याबाबतचे प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करत प्रशिक्षण देण्यात आले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संत तुकाराम भवन येथे दि.21 जून रोजी 108 चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर शेळके,पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन करण्यात आले.एखाद्या रुग्णाला रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत प्राथमिक उपचार देता यावेत यासाठी प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.यामुळे वारी काळातील रुग्णांना वेळेवर औषधोपचार, वेळेवर वैद्यकीय मदत मिळून रुग्णाच्या जीवित्तास धोका कमी करण्यास मदत होणार आहे.

आरोग्य विभागाने यावर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत गुड समारिटन नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून वारकर्‍यांना आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी त्वरित संपर्क साधता येणार आहे.अ‍ॅपवर आलेल्या माहितीवरून रुग्णवाहिका चालकाला रुग्णाचे ठिकाण अचूक कळणार.यामुळे वारीतील रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळून रुग्णाच्या जीवितास धोका कमी होण्यास मदत होणार आहे.गुड समारिटन हे अ‍ॅप शासनाच्या आरोग्य विभाग आणि एसपीईआरओ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आले आहे.अ‍ॅपल स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअर वरून ते मोफत डाउनलोड करता येते.या अ‍ॅपमुळे केवळ रुग्णवाहिकेशी संपर्कच साधता येणार नाही तर प्राथमिक उपचाराची माहितीही यामध्ये दिली आहे.त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचण्या पूर्वी रुग्णाला काही आवश्यक मदत दिली जाऊ शकते.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने व 108 चे मुख्य अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर शेळके यांच्या मार्गदर्शनाखली वारकरी भाविकांना पालखी मार्ग,तळांवर तसेच पंढरपूर शहरात आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापक सोलापूर डॉ.अनिल काळे यांनी सांगितले.

यावेळी डॉ.मेघना झेंडे ट्रेनिंग डिपार्टमेंट हेड , डॉ.किशोर देव ऑपरेशन हेड,डॉ.प्रियंक जावळे जिल्हा व्यवस्थापक पुणे, डॉ.अनिल काळे जिल्हा व्यवस्थापक सोलापूर , डॉ. कौस्तुभ घाटुळे जिल्हा व्यवस्थापक सांगली, डॉ. प्रतिक पाटील, डॉ.सीमरण केशवाणी, सुनिल चव्हाण,युवराज वाघ, दिलीप शिंदे, महेश कदम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top