अनेक रस्त्यांवर रस्ता की खड्डे असा प्रश्न भाविकांना ?

दोन तीन महिन्यांपासून तयारी सुरु असताना हे सर्व कसे ?

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०६/२०२५- पंढरपूर येथे आषाढी वारीची तयारी झाली आहे.रस्ते दुरुस्ती सुरु असून अतिक्रमण काढणे चालू झाले आहे.अनेक भागात अतिक्रमण पथक आले की ती हटवली जातात आणि त्यांची पाठ फिरली की पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.यामुळे रस्ते अपुरे पडत आहेत.सरगम टॉकीज जवळील रस्ता,भोसले चौक परिसर, बस स्थानकापासून नगरपालिकेकडे जाणारे रस्ते,स्वातंत्र्यवीर सावरकर चौकासह अनेक रस्त्यांवर रस्ता की खड्डे असा प्रश्न भाविकांना पडला आहे.दोन तीन महिन्यांपासून तयारी सुरु असताना हे सर्व कसे ?

सरगम टॉकीज जवळील रस्ता,भोसले चौक परिसर,बस स्थानकापासून नगरपालिकेकडे जाणार्या रस्त्यावर जेऊरकर दुकानाजवळ जोड रस्त्यावर गटारीचे दोन खड्डे बरोबर कोपर्यावरती आहेत.पावसाच्या पाण्याने हे भरल्यानंतर लक्षात येत नाहीत त्यामुळे दोन चाकी व चार चाकी वाहनांचे अपघात होत आहेत.अनेक वर्षांपासून हे खड्डे आहेत.

तसेच त्या खड्ड्यांच्या बाजूलाच कचराकुंड झाले आहे.प्राणी तो कचरा रस्त्यावर पसरत असून पावसामुळे अतिशय दुर्गंधी सुटली आहे.या ठिकाणी डासांचे आणि माशांची प्रचंड उत्पत्ती होत असल्याने डेंग्यू,मलेरिया, गॅस्ट्रोच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.भाविकांनाही धोका होण्याची शक्यता आहे.तरी याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Back To Top