सन २०२७ च्या गणेशवाडी चातुर्मासात वीराचार्य स्मारकाचे लोकार्पण करणार – आचार्यश्री चंद्रप्रभसागर महाराज

सन २०२७ च्या गणेशवाडी चातुर्मासात वीराचार्य स्मारकाचे लोकार्पण करणार- आचार्यश्री चंद्रप्रभसागर महाराज

वीराचार्य स्मारकाला सर्वतोपरी मदत करणार..दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष भालचंद्र पाटील

शिरोळ / ज्ञानप्रवाह न्यूज : वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचा त्याग फार मोठा होता आम्हीही त्यांच्या संस्काराने मंडीत झालो.दक्षिण भारत जैन सभा आणि जैन समाज प्रगतीत वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचे ऐतिहासिक योगदान आहे.प.पू. आचार्यश्री चंद्रप्रभसागर महाराजांनी गणेशवाडीत वीराचार्यांचे भव्य दिव्य स्वरुपात स्मारक उभे करण्याचा संकल्प सोडला आणि आज भूमीपूजन करुन त्यांच्या गणेशवाडीत होणाऱ्या सन २०२७ मधील चातुर्मासात स्मारकाचे लोकार्पण करण्याचा जाहीर केले.हा समाजोपयोगी निर्णय तडीस जाणारच.समस्त जैन समाज, दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल व सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी चालवलेल्या विविध संस्था आणि कार्यकर्ते यांची भरघोस मदत या स्मारकाला राहिल असे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे नूतन अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले. ते गणेशवाडी येथील वीराचार्य स्मारक भूमीपूजन कार्यक्रमात बोलत होते.

आचार्यश्री चंद्रप्रभसागर महाराजांच्या मार्गदर्शन व पावन सान्निध्यात आज गणेशवाडीत वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे स्मारकाचे भूमीपूजन स्मारकाचे बृहत देणगीदार स्व.सुशिला आप्पू कनवाडे यांच्या स्मरणार्थ श्रीमती जयश्री आण्णासो कनवाडे व श्रीमती मंगल बाबासो कनवाडे तर्फे चेतन व सौ.स्नेहा कनवाडे यांचे हस्ते झाले.

स्मारक भूमीपूजन मंत्रसंस्कार व पूजा श्लोकपठण आचार्यश्री चंद्रप्रभसागर महाराजांनी केले.यावेळी आचार्यश्री चंद्रप्रभसागर महाराज मंगलप्रवचनात म्हणाले,वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचे योगदान ही माझी दिक्षेची प्रेरणा आहे. त्यांनी जैन समाज संघटन मजबूत करुन सुसंस्कृत व व्यसनमुक्त पिढी घडवली.त्यांचे विचार नव्या पिढीला मार्गदर्शक आहेत.स्मारकातून ग्रामविकास ही सामाजिक संकल्पना राबवण्याची योजना आहे.या स्मारकाच्या माध्यमातून चांगले तज्ञ वक्ते आणून नियमित सामाजिक, सांस्कृतिक आणि कृषी प्रबोधन करण्यात येईल. नव्या पिढीला डिजीटल तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येईल.या कामी दक्षिण भारत जैन सभा,वीर सेवा दल, विविध संस्था, आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर,माजी खासदार राजू शेट्टी,आमदार राहूल आवाडे,अरिहंत उद्योग समूहाचे उत्तम पाटील,शेतकरी नेते सावकर मादनाईक हे स्मारक कामाला मदत करणार आहेत.

यावेळी आचार्यश्री विद्यासागर महाराजांचे वीराचार्य व स्मारकाचे महत्त्व या विषयावर मंगल प्रवचन झाले आणि त्यांनी वीराचार्य स्मारकाला माझा आशीर्वाद असून सर्वांनी मिळून हे कार्य तडीस न्या असा आशीर्वाद दिला. स्वागत प्रा.एन.डी.बिरनाळे यांनी केले.आभार दादासो कुचनुरे यांनी मानले.

यावेळी गावचे सरपंच प्रशांत अपीने म्हणाले, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे गणेशवाडीची ओळख आहे. त्यांच्या कार्याने गावचे नाव झाले आहे. त्यांचे विचार सर्व धर्मीय जनतेला मार्गदर्शक आहेत.स्मारक उभारणीसाठी गावातील सर्व धर्मीय लोकांचा सहभाग राहील.या कामी मी अग्रभागी राहून मदत करणार आहे.

वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि वीर सेवा दल स्मारक उभारणीत पुढे राहिन असे सांगितले.

सेक्रेटरी अजित भंडे यांनी वीर सेवा दलाने केलेली वीराचार्य स्मारकाची माहिती दिली व गणेशवाडीतील स्मारक पूर्ण होण्यासाठी सर्व ती मदत करु असे सांगितले.

सदा आंबी यांनी वीराचार्यांच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढून देणगी जाहीर केली. यावेळी भालचंद्र पाटील,सुभाष शिरगावे, नरसू शिरगावे,विद्यासन्मतीदास सेवा संस्था, चंदाबाबा सेवा प्रतिष्ठान, सन्मती संस्कार मंच, विजयकुमार सकळे वकील व गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी स्मारकाला बृहत दान स्विकृत केले. देणगीदारांनाही भूमीपूजन मानकऱ्यांचा मान बहाल करण्यात आला.

प्रा.एन.डी.बिरनाळे,धनपाल खोत,आप्पू खोत, प्राचार्य संजय खोत, प्रकाश दानोळे आलास, सुभाष मगदूम शिरटी, बाबासाहेब हुपरे रुई,नितीन शेट्टी औरवाड, गोपाल चौगुले, सुधीर डिग्रजे, तीर्थंकर माणगावे,हसूर जिन मंदिर कमिटी, कल्पद्रुम पतसंस्था चेअरमन नेमगोंडा पाटील व सर्व सदस्य, सन्मती संस्कार मंच सांगली,जयसिंगपूर पदाधिकारी व सदस्य, विद्यासन्मतीदास संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, चंदाबाबा सेवा प्रतिष्ठान ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य, गणेशवाडीचे सरपंच प्रशांत अपीने,उपसरपंच जयपाल खोत आणि ग्रा. पं.चे सर्व सदस्य, संदीप अपीने पोलीस पाटील, महेश देवताळे, विजयकुमार गाताडे, सुहास मडिवाळ, दादासो देवतळे, सदाशिव आंबी, बाबासो अपीने,पंकज कनवाडे, मनोहर उदगावे,बाळासाहेब खोत,परशुराम गोराजे, डॉ.दाजी शिरगावे, गावातील सर्व श्रावक श्राविका,ग्रामस्थ, भ.आदिनाथ जिन मंदिर, भ.महावीर दिगंबर जैन मंदिर कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य,वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, ब्राम्ही युवती मंडळ, कागवाड, शिरगुपी व परिसरातील सर्व वीराचार्यांवर प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top