राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बजेटचा जाहीर निषेध

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने बजेटचा जाहीर निषेध

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०७/२०२४- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पंढरपूर तालुका व शहर च्या वतीने आज केंद्र सरकारने 2024/25 च्या काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याला कुठल्याही प्रकारची भरीव अशी आर्थिक तरतूद नसल्याने महाराष्ट्रातल्या कष्टकरी, कामगार,शेतकरी जनतेचा रोष पंढरपुरात अर्थमंत्री निर्मला सीतारामन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोडे मारून व्यक्त करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राला अशा प्रकारची वागणूक का देण्यात आली याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनावेळी एकच दोष…महाराष्ट्रावर रोष…अशा प्रकारच्या घोषणा देऊन केंद्र सरकार,पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे,दत्तात्रय माने, प्रताप पवार, अनिल सप्ताळ,बिपीन देवमारे,अर्जुन शेटे,विजय मोरे, आनंद कथले,सचिन आदमिले , सोमनाथ गोरे, महिला अध्यक्ष राजश्री ताड,सुनंदा उमाटे, सौदागर गायकवाड,अलका लोखंडे यांच्यासह पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top