खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत मराठा समाज व धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा केला उपस्थित
सोलापूर चा दुष्काळ संपला,१० वर्षात पहिल्यांदाच सोलापुरच्या खासदारांचा आवाज संसदेत गरजला…
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०७/२०२४- आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदीय अधिवेशनात मराठा समाज,धनगर समाज आरक्षणावर आवाज उठविला.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गाला आरक्षण मिळवून दिले.पण केंद्र सरकार खाजगीकरण करून आरक्षण संपवित आहे.त्यामुळे आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज, धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे.मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यामुळे राज्यात तणाव वाढत आहे.केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे म्हणून लवकरात लवकर मराठा समाज व धनगर समाजाला आरक्षण द्यावे.त्याच प्रमाणे महिला आरक्षणही लागू करावे अशी मागणी संसदेच्या शून्य प्रहारावेळी केली आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय गणना करण्याची मागणी केली आहे ती ही मान्य करावी असेही खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.