महाराजस्व समाधान शिबिर अभियानातून दाखले वाटप- तहसिलदार सचिन लंगुटे

महाराजस्व समाधान शिबिर अभियानातून दाखले वाटप- तहसिलदार सचिन लंगुटे

पंढरपूर तालुक्यातील विद्यार्थी,नागरिकांनी लाभ घ्यावा

दि.15 मे रोजी पंढरपूर महसूल विभागांतर्गत 11 मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

पंढरपूर :- महसूल विभागांतर्गत मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान दि.15 मे रोजी पंढरपूर महसूल विभागांतर्गत 11 मंडल स्तरावर राबिवण्यात येत आहे.या शिबीरातून आवश्यक दाखले देण्यात येणार असून याचा लाभ विद्यार्थी,नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन तहसिलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.

तहसिलदार सचिन लंगुटे

इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी आवश्यक दाखले (उदा.उत्पन्न,वय व अधिवास,जातीचा दाखला,नॉन क्रिमीलेयर दाखला व इतर दाखले देण्यासाठी तसेच नागरिकांना रहिवाशी,उत्पन्न व जातीचे दाखले देण्यासाठी पंढरपूर तालुक्यात दि.15 रोजी पंढरपूर, भाळवणी,पुळूज, कासेगांव,तुंगत,खर्डी,चळे, भंडीशेगांव,रोपळे,करकंब,पटवर्धन कुरोली या महसूल मंडळाचे ठिकाणी मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयात विशेष शिबीर आयोजित करण्यात येत आहे.या मंडलातील गावातील नागरिक, विद्यार्थी यांनी आपापल्या मंडळाच्या केंद्राच्या ठिकाणी जावून लाभ घेण्याचा आहे.

या शिबीरावेळी मंडळ निहाय महा ई सेवा केंद्र चालक यांची नेमूणक करण्यात येत आहे. तरी शालेय विद्यार्थी व नागरिकांनी गांवनिहाय महा ई सेवा केंद्र चालक यांच्याशी संपर्क साधवा.या शिबीरामध्ये जास्तीत संख्येने उपस्थित राहून दाखले प्राप्त करुन घ्यावेत असे आवाहन तहसिलदार लंगुटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top